< >
Join now to discover more
or create your own Quizzes
Quiz
GoConqr is a social learning network with free tools, resources, courses and groups.
already a member? Log in

अलंकार

Question 1 of 20

Medal-premium 1

खालील वाक्यातील उपमान सांगा.
सुशीला गोगलगायी सारखी हळू हळू चालत होती.

Select one of the following:

 • हळू हळू

 • गोगलगाय

 • सुशीला

 • सारखी

Question 2 of 20

Medal-premium 1

पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
लहानपण देगा देव l मुंगी साखरेचा रवा l ऐरावत रत्न थोर l त्यासी अंकुशाचा मार.

Select one of the following:

 • उपमा

 • दृष्टांत

 • उत्प्रेक्षा

 • अतिशयोक्ती

Question 3 of 20

Medal-premium 1

'वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे'-या पंक्तीतील 'कवळ' या शब्दाचा अर्थ खालील पैकी कोणता आहे?

Select one of the following:

 • गवत

 • दात

 • जुडी

 • घास

Question 4 of 20

Medal-premium 1

पुढील काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे.
''कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला. हसले दुरून कोणी, जवळून वार केला ll

Select one of the following:

 • उपमा

 • दृष्टांत

 • यमक

 • श्लेष

Question 5 of 20

Medal-premium 1

आभाळागत माया तुझी, आम्हावरी राहू दे l

Select one of the following:

 • अतिशयोक्ती अलंकार

 • अनुप्रास अलंकार

 • दृष्टांत अलंकार

 • उपमा अलंकार

Question 6 of 20

Medal-premium 1

या जमादाग्नीच्या समोर उभा राहण्याचे तरी धाडस होईल का?

Select one of the following:

 • अतिशयोक्ती अलंकार

 • श्लेष अलंकार

 • रूपक अलंकार

 • व्यतिरेक अलंकार

Question 7 of 20

Medal-premium 1

जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात हि कन्या l साधी निसर्ग सुंदर भासे ती देवता जाणो वन्या l

Select one of the following:

 • श्लेष अलंकार

 • उपमा अलंकार

 • विरोधाभास अलंकार

 • उत्प्रेक्षा अलंकार

Question 8 of 20

Medal-premium 1

मरणात खरोखर जग जगतेll

Select one of the following:

 • दृष्टांत अलंकार

 • उपमा अलंकार

 • विरोधाभास अलंकार

 • सार अलंकार

Question 9 of 20

Medal-premium 1

हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता.

Select one of the following:

 • उपमा अलंकार

 • श्लेष अलंकार

 • रूपक अलंकार

 • उत्प्रेक्षा अलंकार

Question 10 of 20

Medal-premium 1

एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून गेला.

Select one of the following:

 • अतिशयोक्ती

 • भ्रांतिमान

 • रूपक

 • अनन्वय

Question 11 of 20

Medal-premium 1

हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मीर तेथे हिंदूचे वैऱ्यासंगे चाले रणकंदन

Select one of the following:

 • श्लेष

 • उत्प्रेक्षा

 • अनुप्रास

 • रूपक

Question 12 of 20

Medal-premium 1

देवा दिनदयाळा! दूर द्रुत दास, दु:ख दूर दवडी शांतीच मज दे...

Select one of the following:

 • शब्दालंकार

 • अनुप्रास

 • यमक

 • उपमा

Question 13 of 20

Medal-premium 1

आई सारखी आईच

Select one of the following:

 • दृष्टांत अलंकार

 • श्लेष अलंकार

 • रूपक अलंकार

 • अनन्वय अलंकार

Question 14 of 20

Medal-premium 1

मित्राच्या उद्याने कोणाला आनंद होत नाही!

Select one of the following:

 • उत्प्रेक्षा अलंकार

 • रूपक अलंकार

 • अतिशयोक्ती

 • श्लेष अलंकार

Question 15 of 20

Medal-premium 1

मातीत ते पसरले अति रम्य पंख, केले वरी उदर पांडूर निष्कलंक.

Select one of the following:

 • दृष्टांत

 • स्वभावोक्ती

 • अर्थान्तरन्यास

 • व्यतिरेक

Question 16 of 20

Medal-premium 1

'हा आंबा प्रत्यक्ष साखरच' या विधानातील उपमान ओळखा.

Select one of the following:

 • आंबा

 • प्रत्यक्ष

 • साखर

 • साखरच

Question 17 of 20

Medal-premium 1

सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी! (अलंकार ओळखा)

Select one of the following:

 • श्लेष अलंकार

 • यमक अलंकार

 • अतिशयोक्ती

 • उपमा अलंकार

Question 18 of 20

Medal-premium 1

'अमृताहूनी गोड नाम तुझे देवा' हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

Select one of the following:

 • अपन्हुती

 • व्यतिरेक

 • श्लेष चेतन

 • चेतनगुनोक्ती

Question 19 of 20

Medal-premium 1

गणपत वाणी विडी पितांना, चावायाचा नुसतीच काडी; म्हणायचा अन मनाशीच कि, ह्या जागेवर बांधीन माडी. या काव्य रचनेतील अलंकार ओळखा.

Select one of the following:

 • रूपक

 • स्वभावोक्ती

 • उत्प्रेक्षा

 • अनुप्रास

Question 20 of 20

Medal-premium 1

अरे वेड्या सोनचाफ्या, काय तुझा रे बहर.

Select one of the following:

 • विरोधाभास अलंकार

 • अनन्वय अलंकार

 • चेतनगुनोक्ती अलंकार

 • सार अलंकार

Icon_fullscreen

अलंकार

dahakesv
Quiz by , created over 2 years ago

Quiz on अलंकार , created by dahakesv on 04/02/2015.

Eye 267
Pin 0
Balloon-left 0
Tags
dahakesv
Created by dahakesv over 2 years ago
Close